अहमदनगरच्या या तालुक्यातून अज्ञात तरुणाने मुलीला नेले पळवून
राहुरी: राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे खळबळजनक घटना घडली आहे. डिग्रस येथील एका मुलीला अज्ञात तरुणाने पळवून नेले असल्याची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दिनांक ९ जून रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास या मुलीला तिच्या घरासमोरून एका अज्ञात तरुणाने पळवून नेले आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर घरातील नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती मात्र मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ आव्हाड करीत आहे. मुलगी कोणी पळवून नेली याबाबत कोणावर संशय व्यक्त करण्यात आला नाही. पोलीस कसून चौकशी करत आहे.
Web Title: Rahuri unidentified youth kidnapped the girl