महिलेने चक्क बिबटयावर केला दगडांनी हल्ला
महिलेने चक्क बिबटयावर केला दगडांनी हल्ला
राहुरी : तालुक्यातील नरसाळी येथील एका महिलेने चक्क बिबटयावर दगडांनी हल्ला करुन हातातील खुरप्याची धाक दाखवुन त्याला पिटाळुन लावल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
नरसाळी येथील एका शेतकरी महिलेने मीना मधुकर राजुळे (वय ५३) या शेताच्या बांधवर गवत घेत होत्या. यावेळी त्यांच्या कडे बिबटया चालुन येत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहुन त्यांनी शेजारी असलेल्या दगडांचा मारा बिबटयावर केला. तरीही बिबटया मीना मधुकर राजुळे यांच्या दिशेने येतच होता. जवळ कुणीही नसल्यानं बिबटयाशी प्रतिकार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुमारे ६० फुटांवर बिबटया आल्यांनतर मीना मधुकर राजुळे यांनी हातातील खुरपे बिबटयावर अगारले. यानंतर बिबटयाही थोडा थबकला. मीना बिबटयाच्या दिशेने खुरपे घेऊन धावल्या. त्यानंतर बिबटयाने धुम ठोकली.त्यानंर मीना राजुळे यांनी शेताच्या बांधावरचे गवत खुरपुन गवताचे गाठोडे डोक्यावर घेऊन घर गाठले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.