Home अहमदनगर राहुरी: ग्रामसेवकाच्या चौकशीसाठी क्रांती सेनेचे आमरण उपोषण

राहुरी: ग्रामसेवकाच्या चौकशीसाठी क्रांती सेनेचे आमरण उपोषण

ग्रामसेवकाच्या चौकशीसाठी क्रांती सेनेचे आमरण उपोषण

राहुरी : डिग्रस ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडत क्रांती सेनेच्या वतीने ग्रामसेवकांची चौकशी मागणी करण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा पंचायत समिती राहुरीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
  या निवेदनात म्हटले आहे की, २७ जुन रोजी डिग्रस ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी पंचायत समिती कडे भ्रष्टाचाराचे पुरावे देत निवेदन सादर केले होते.पण या निवेदनाची दखल न घेता आजतागायत ग्रामसेवकावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.या सर्वांचा विचार करून क्रांती सेना २७ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
  या भ्रष्टाचाराच्या विरोधी आमरण उपोषण आंदोलनामुळे  होणार्या परिणामास जबाबदार अधिकारी असतील व या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे, उपाध्यक्ष सचिन शिरसाट,युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार,युवा तालुकाध्यक्ष शाम कदम, शहराध्यक्ष संतोष मेहेत्रे,गितेश देवरे, कृष्णा तारडे , अनिल वाणी,योगेश जाधव आदींनी केले आहे.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here