पोलीसाचेच घर चोरट्याने फोडले, गुन्हा दाखल
राहुरी(Rahuri): राहुरी शहरातील बिरोबानगर येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी घर फोडल्याची घटना घडली आहे. घरातून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. हे घर एका पोलीसाचेच होते.
राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक वैभव सुखदेव साळवे हे काही वर्षापासून राहुरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते मुळचे सोनई येथील रहिवासी आहेत. त्यामुळे ते राहुरी येथील बिरोबानगर येथे शिक्षक बँकेजवळ भाडोत्रीने आपल्या कुटुंबासमवेत राहतात. शनिवारी वैभव साळवे हे खासगी कामानिमित्त कुटुंबासह मूळ गावी सोनई येथे गेले. राहुरी येथील घर बंद होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत सोमवारी पहाटे घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व सामानची उचकापाचक केली. साळवे यांच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने जवळपास अडीच तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी साळवे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Rahuri police home theft