शेतीच्या पाण्याच्या वादातून सख्या भावानेच केला भावाचा खुन
राहुरी | Murder: राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे ६ एप्रिल रोजी शेतीला पाणी देण्याच्या कारणातून सख्या भावानेच व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांस लाथाबुक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे.
याबाबत दत्तात्रय पुंजाहारी आढाव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी खुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे ६ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजे दरम्यान फिर्यादी दत्तात्रय आढाव यांचे मयत भाऊ ज्ञानेश्वर पुंजाहारी आढाव यांना फिर्यादीचे शेतातील बोअरवेलचे पाणी त्यांच्या शेतात घेऊन जायचे होते. त्यासाठी मयत ज्ञानेश्वर आढाव हे आरोपी विष्णू पुंजाहारी आढाव यांच्या शेतातून पाईप जोडत असताना आरोपी विष्णू आढाव व प्रतिक विष्णू आढाव हे दोघे तेथे आले आणि मयत ज्ञानेश्वर यांना म्हणाले की, तु आमच्या शेतातून पाईप जोडू नको असे म्हणून त्यांनी मयत ज्ञानेश्वराला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडके व लोखंडी खोऱ्याने जबर मारहाण केली. यावेळी ज्ञानेश्वर आढाव यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी विष्णू पुंजाहारी आढाव व प्रतिक विष्णू आढाव या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rahuri Own Brother Murder