मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक, एक ठार
राहुरी Rahuri: राहुरी तालुक्यातील डीग्रस फाटा येथे चार चाकी वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे.
मयत सैबाज कमरुद्दीन पठाण वय २३ रा. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील तरुण होता. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
सैबाज कमरुद्दीन पठाण हा तरुण तिसगाव येथून श्रीरामपूरकडे जात होता. नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुका हद्दीतील डिग्रस फाटा येथे पाठीमागून आलेल्या चार चाकी चालकाने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या मोटारसायकल चालक सैबाज कमरुद्दीन पठाण हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तो उपचारपूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. याप्रकरणी हुसेन शेख याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rahuri Motorcycle Accident one death