Home अहमदनगर अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून बेपत्ता, गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून बेपत्ता, गुन्हा दाखल

Rahuri Minor girl goes missing

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) झाल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. तिला राहत्या घरातून पळवून नेला असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील देवळाली येथे राहत असत. दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ती तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. तिला संशयीत आरोपी अनिकेत गोरख चव्हाण रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याने पळवून नेले असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांना आहे.

याबाबत त्या मुलीच्या आईने राहुरी पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत गोरख चव्हाण रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याच्या विरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार भिताडे हे करीत आहेत.

Web Title: Rahuri Minor girl goes missing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here