Home अहमदनगर पतीच्या छळास कंटाळून विवाहितेने स्वतःला घेतले पेटवून

पतीच्या छळास कंटाळून विवाहितेने स्वतःला घेतले पेटवून

Rahuri married woman set herself on fire

राहुरी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याने त्रासाला कंटाळून राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील विवाहित तरुणीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे.

माया साळवे असे या तरुण विवाहितेचे नाव आहे. उपचार सुरु असताना ती मयत झाल्याची घटना दिनांक १ एप्रिल रोजी घडली. या तरुणीचे माहेर संगमनेर तालुक्यातील आहे. काही वर्षापूर्वी या तरुणीचा विवाह राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील राहुल दत्तात्रय साळवे याच्याशी झाला होता. २०१९ ते २६ मार्च २०२१ या कालावधीत पती आरोपी राहुल दत्तात्रय साळवे हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व शिवीगाळ करत होता. तसेच त्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून मयत माया साळवे हिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यात ती गंभीर जखमी झाली. लोणी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला, मायाचे वडील अंतोन खरात वय ४५ निमगाव जाळी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून राहुल दत्तात्रय साळवेयाच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल साळवे यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश्कुमार वाघ हे करीत आहे.  

Web Title: Rahuri married woman set herself on fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here