भाजपचे तालुकाध्यक्ष भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश
Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील भाजपा अध्यक्ष यांनी भाजपला रामराम केला असून त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घातले आहे.
विखे-कर्डिले गटाचे कट्टर समर्थक अमोल भनगडे काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी २.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, ना.जितेंद्र आव्हाड, ना प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भाजप तालुकाध्यक्ष भनगडे हे राष्ट्रवादीत जाणार अशी वारंवार चर्चा बऱ्याच काही दिवसांपासून सुरु होती. त्यांनी आज अचानक मुंबईकडे प्रस्थान करीत आज दुपारी २.०० वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील व ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत किरण कोळसे, मंजाबापू कोबरणे, पोपट कोबरणे, संतोष आघाव, भारत भुजाडी, सुयोग नालकर, अनिल घाडगे आदी उपस्थित होते.
Web Title: Rahuri BJP’s taluka president joins NCP saying goodbye to BJP