तरुणीने प्रेमास नकार दिल्याने तिच्या घरासमोरच प्रियकराने घेतले जाळून
राहता | Rahata: राहता तालुक्यातील ही घटना आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोर पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. तरुणीचा प्रेमास नकार होता. जाळून घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे.
प्रेमसंबधास तरुणीने नकार दिल्याने प्रियकराने चिडून तिच्या घरासमोरच स्वतःला पेटवून घेतले आहे. पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीला घरात घुसून कवेत घेण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला आहेत तर प्रेयसी व तिचे वडील जखमी झाले आहेत. सार्थक वसंत बनसोडे वय २२ रा. साकुरी ता. राहता असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकारांना माहिती दिली यामध्ये म्हणाले, बनसोडे यांचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघे एकाच वर्गात शिकत होते. काही दिवसांपूर्वी तरुणीने प्रेमास विरोध केला. त्यामुळे या युवकाने नैराश्येतून हे कृत्य केले. या घटनेत मुलीला वाचविण्यासाठी गेलेले वडील जखमी झाले आहेत. सार्थक हा गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. गणपत गोंदकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Rahata young woman refused to make love and was burnt by her boyfriend