Home राहाता वीरभद्र मंदिरातील मुकुट व दागिने चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद

वीरभद्र मंदिरातील मुकुट व दागिने चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद

Rahata Virbhadra Mandir Accused arrested for stealing crown and jewelery

राहता | Rahata: राहता येथील वीरभद्र मंदिरातील मुकुट व दागिने चोरणारा आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या एका आरोपीस पेमगिरी डोंगरातील जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील आहे. नांदुरी दुमाला येथे शेतामध्ये लपवून ठेवलेले चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यामुळे राहात्याच्या ग्रामस्थांनी आनंद साजरा करत अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा सत्कार केला आहे.

१५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी चोरट्याने राहात्याच्या वीरभद्र मंदिरात चोरी केली होती. याबाबत देवस्थानाने गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे उपविभागीय अधिकारी यानी मंदिरास भेट देऊन आरोपीचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या.

चोरट्यांचा शोध सुरु असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरचा गुन्हा भास्कर पथवे रा. नांदुरी दुमाला याने केला आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदुरी येथे जाऊन आरोपीबाबत माहिती घेतली. हा आरोपी पेमगिरी येथील जंगलात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी रात्रभर जंगलामध्ये सापळा लावला. पहाटेच्या सुमारास पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जंगलामध्ये जाऊन आरोपी भास्कर पथवे याला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत.  

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News Today, and Latest Marathi News Live

Web Title: Rahata Virbhadra Mandir Accused arrested for stealing crown and jewelry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here