राहता: विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग
राहता: विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग
राहाता तालुक्यातील एका नामांकित मराठी शाळेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला गेल्याने पालक वर्गात संताप निर्माण झाला आहे. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत संबंधित तरूणावर गुन्हा दाखल केला गेला नव्हता. ही घटना बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
शाळा सुटल्यानंतर मुलगी शाळेच्या बाथरूममध्ये गेली असता एक तरूण तिच्यामागे आत गेला आणि त्याने दरवाजा बंद करत मुलीला चाकू दाखवत तिच्याशी अश्लिल कृत्य केले. त्यानंतर लगतच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. मुलीने घरी गेल्यावर हा प्रकार आईला सांगितला. गुरूवारी मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती शिक्षकांना सांगितली.
शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी तरुण त्यात दिसला. मात्र, संबंधित शिक्षकाने त्याचा शोध घेणे व पोलिसांना कळविण्याचे सोडून तिच्या पालकांची समजूत काढून त्यांना घरी परत पाठवले. या घटनेची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्यांनी मुलीसह पालकांना घेऊन गुरूवारी रात्री राहाता पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.
You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date
शुक्रवारी पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. अश्लिल कृत्य करणारा तरुण कोणत्या मार्गे पळाला, हे पाहण्यात आले. काही नागरिकांनी त्या तरुणास पळताना पाहिले आहे. पीडित मुलीच्या पालकांची फिर्याद दाखल करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे यांनी दिली.
या प्रकारामुळे पालकांत संतापाची लाट निर्माण झाली. या शाळेत यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. मात्र, प्रशासनाने डोळेझाक केली. अशा कृत्यांना प्रतिबंध करण्याऐवजी प्रशासन घटना दाबण्याचा का प्रयत्न करते, असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे. आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
