अनैतिक हायप्रोफाईल वेश्या व्यावसायावर पोलिसांचा छापा
राहता | Rahata: राहता तालुक्यातील बाभळेश्वर चौकामधील यमुना लोजींग येथे सुरु असलेल्या अनैतिक हायप्रोफाईल वेश्या व्यावसायावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंगचे मालक बाळासाहेब पानसंबळ हा महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार डीवायएसपी संदीप मिटके यांनी छापा टाकला आहे. यमुना लोजींग येथे पोलीस कर्मचारी यांना बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. शासकीय पंचासमक्ष छापा टाकत दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी आरोपी प्रवीण बाळासाहेब पानसंबळ रा. निर्मळ पिंपरी व अरबाज मोहमद शेख रा. बाभळेश्वर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोणी येथील पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rahata Police raid high-profile prostitution business