मुलाखतीसाठी निघालेल्या दोन चुलत भावांचा पिकअपच्या धडकेत मृत्यू
Ahmednagar News Live | Rahata Accident | राहता: राहता तालुक्यातील आडगाव येथील दोघे चुलत भाऊ नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असताना काळाने घाला घातला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पिक अपच्या धडकेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
विशाल शिवाजी शेळके वय २५, अजित कैलास शेळके या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. गुरुवारी पुण्यातील एका कंपनीमध्ये दोघांची मुलाखत होती. त्यासाठी राहता तालुक्यातील आडगाव येथून दोघे भाऊ मोटारसायकलवरून पुणे येथे निघाले होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावाजवळून जात असताना मालवाहतूक पिकअपने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर पिक अप चालक पसार झाला. विशाल आणि अजित हे चुलत भाऊ होते. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rahata Accident Two cousins killed in pick-up collision