Radhakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर जोरदार टीका
राहता: राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कार्यक्रमात विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या नव्या धोरणाचे कौतुक करत विरोधाकंवर जोरदार टीका केली आहे.
कृषी विधेयकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
कॉंगेस आघाडी सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशात कृषी क्षेत्रासाठी मॉडेल अॅक्ट आणला. राज्यातही कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना खासगी बाजार समित्या, वायदे बाजार, ऑनलाइन ट्रेडिंग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी कृषिमंत्री कोण होते, हे सर्वांना माहिती आहे असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सादर केलेल्या नवीन कृषी धोरणाचे स्वागत विखे पाटील यांनी केले आहे. ते म्हणाले या धोरणांमुळे कृषी क्षेत्राला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टींचा समावेश या धोरणात असल्याने कृषी व्यवसायात अमूलाग्र बदल क्रांतीची सुरुवात होत आहे. विरोधक केवळ राजकारणासाठी विरोध करीत आहेत.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Radhakrishna Vikhe Patil strong criticism of Sharad Pawar