डमी ग्राहक पाठवल्याने स्पा सेंटरचं पितळ उघड; रॅकेटचा पर्दाफाश, तीन तरुणींची सुटका
Beed Crime News: स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाणा (Prostitution) चालविणाऱ्या रॅकेटचा पितळ उघडं करण्यात बीड पोलिसांना यश.
बीड: बीड शहरातील एका भागात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. बीड शहरातील गजबजलेल्या भागात स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाणा चालविणाऱ्या रॅकेटचा पितळ उघडं करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. याच ठिकाणी पोलिसांनी धाड मारून तीन अविवाहित मुलींची सुटका करण्यात आली. तसेच मालकासह व्यवस्थापकाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यानंतर छापा टाकला असता तीन पीडितांची सुटका करण्यात आली.
एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता. मंबईच्या अविवाहित मुलींना बीडला आणत त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सोमवारी रात्री 8 वाजता अचानक धाड मारून ही कारवाई केली. यातील मालक व व्यवस्थापक दोघेही फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्वेता खाडे, हवालदार आतिष देशमुख, अशोक नामदास, ढगे, संतराम थापडे, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण आदींनी ही कारवाई केली.
Web Title: racket running prostitution in the name of spa center is exposed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App