Corona Vaccine: जर पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यावर सोडणार का लसींवरून केंद्राला सवाल
Corona Vaccine: राज्यांना कोरोना लस पुरविण्यास जगभरातील कंपन्यांनी नकार दिल्यामुळे राज्यातील १८-४४ वयोगटाचे लसीकरण बंद झाले आहे. यावर अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
ही अवस्था केवळ दिल्लीतच नाही तर देशभरात आहे. नवे लसीकरण केंद्र सुरु करण्यापेक्षा आहे तीच बंद करण्याची वेळ आली आहे. केंद्राने हात वरती केले आहे. केंद्र लसी का खरेदी करत नाही. लसींची खरेदी आपण राज्यावर सोडू शकत नाही. संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. जर पाकीस्तानने हल्ला केला तर तुम्ही याची जबाबदारी राज्यांवर सोडणार का? उत्तरप्रदेश स्वतःचे रणगाडे खरेदी करणार का? दिल्ली स्वतःची हत्यारे खरेदी करणार? असा सवाल केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केला आहे.
माझ्या माहितीनुसार देशातील कोणतेच राज्य लसीचा एक डोस खरेदी करू शकलेले नाही. लसी बनविणाऱ्या कंपन्यांनी राज्यासोबत बोलण्यास नकार दिला आहे. ही वेळ केंद्र व राज्य सरकार यांनी एकत्र येऊन लढण्याची आहे. लोकांना लस पुरविणे ही केंद्राची जबाबदारी आहे. आपल्याला टीम इंडियासारखे काम करावे लागणार आहे. जर उशीर झाला तर आणखी किती जीव गमवावे लागतील असा इशारा देखील केजरीवाल यांनी दिला आहे.
Web Title: Question to the center government Corona Vaccine