जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे: पुणे येथे एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची तसेच व्हिडियो क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुमार जाधव असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पिडीत तरुणीच्या एका मैत्रीनीद्वारे आरोपी कुमार सोबत ओळख झाली. या ओळखीतून हे दोघेजन संपर्कात होते. या संपर्कातून आरोपीने ऑगस्ट महिन्यात तरुणीला एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर कोणला काही सांगितल्यास तुला ठार मारेन, तुझा व्हिडियो व्हायरल करेल अशी धमकी दिली. या धमकीने पिडीत मुलीने घरच्यांना काही सांगितले नाही.
त्यांनतर देखील तिच्यावर अत्याचार करणे सुरूच राहिले. अखेर त्या तरुणीने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती चंदननगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किरण वायाळ यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Pune Rape Of A Minor Girl Threatening To Kill