Home क्राईम कारमध्ये ओढून शरीरसुखाची मागणी, नकार देताच बंदुकीचा धाक; धक्कादायक घटना!

कारमध्ये ओढून शरीरसुखाची मागणी, नकार देताच बंदुकीचा धाक; धक्कादायक घटना!

Pune Crime: कारमध्ये ओढून शरीरसुखाची मागणी, महिलेने विरोध केला असता बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी.

Pulled into a car and demanded physical pleasure, threatened with a gun on refusal

पुणे : महिलेने शरीरसुखासाठी नकार दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने महिलेला बंदुकीचा धाक दाखवत तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी चतुः शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत आनंद गाडे असे आरोपीचे नाव आहे.  याबाबत चिंचवड येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

ही घटना बाणेर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील अभिमानश्री हॉटेलजवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,  फिर्यादी व आरोपी चंद्रकांत गाडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीकडे कामाला आहेत.

पीडित महिला २७ ऑक्टोबर रोजी अभिमानश्री हॉटेलजवळून जात असताना आरोपीने त्यांना गाडीत ओढून घेतले. महिलेला मिठी मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने अश्लील शिवागाळ केली. यानंतर त्याने त्याच्या गाडीत असलेली बंदूक काढून महिलेला आयुष्यातून उठवण्याची धमकी दिली. तसेच घरच्यांना संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: Pulled into a car and demanded physical pleasure, threatened with a gun on refusal

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here