अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरवेल, सुजय विखेंचा घणाघात
Vidhansabha Election 2024: तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल असे सडेतोड उत्तर माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
संगमनेर: तालुक्यातील जनतेन तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचे कारण कायॽ अहो ताई, लोकाशाही प्रक्रीयेत मायबाप जनता बाप असते. तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल असे सडेतोड उत्तर माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
साकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ सुजय विखे यांनी पुन्हा एकदा आ.बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. चाळीस वर्षे सर्व सत्तास्थान असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी मिळवून देता आले नाही. या भागात युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत.
या निष्क्रीयतेवर बोललो तर तुम्ही थेट बाप काढाला. आमच्या भागात येवून आमच्या वडीलावर वाटेल तशी टिका केली. पण आम्ही संयम दाखवून राजकारण करणारी माणस आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विखे पाटील परीवाराने नेहमीच आवाज उठवला. या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही आलो आहोत. साकूरची सभा प्रस्थापितांच्या विरोधातील परीवर्तनाची नांदी असल्याचा इशारा डाॅ विखे पाटील यांनी दिला.
वर्षवर्षानुवर्षे ज्या जनतेन निवडून दिले त्यांचा बाप तालुक्याच्या राजकन्या काढायला निघाल्या.पण कोणाच्या बापाबद्दल नाही तर तालुक्याच्या आमदाराच्या निष्क्रीयेतवर बोलल्याचा टोला लगावून विखे पाटील म्हणाले की लोकशाही प्रक्रीयेत जनता मायबाप असते. येणार्या विधानसभा निवडणुकीत जनता ठरवेल तालुक्याचा बाप कोण आहे.पण ताईच्या गाडीत बसणारे त्यांना बोलायला भाग पाडत आहेत. ताईच्या गाडीत बसलेले लोकच त्यांचा घात करणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
तालुक्यातील युवकांनी मनगटातील ताकद दाखवून या प्रस्थापितांना धडा शिकवावा असे आवाहन करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही जेवढा आवाज दाबाल तेवढा तुमच्या घरापर्यत येईल असे डाॅ विखे यांनी ठणकावून सांगितले.
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याने तालूक्याचा आमदार सुध्दा महायुतीचा आपल्याला करायचा आहे. उमेदवार कोणी असो डाॅ सुजय विखे तुमच्या प्रश्नासाठी बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Web Title: public will decide who is the father of the taluka, Sujay Vikhe’s attack
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study