Home पुणे ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन तरुणींची सुटका

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन तरुणींची सुटका

Pune Prostitution Business: पोलिसांचा छापा, परदेशातील तरुणीसह तीन जणींची सुटका केली असून स्पा सेंटरचा मॅनेजर, मालकावर गुन्हा.

Prostitution under the name of 'spa' centre Rescue of three young girl

पुणे: कोंढवा भागात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने छापा कारवाई करण्यात आली आहे.  कारवाईत पोलिसांनी परदेशातील तरुणीसह तीन जणींची सुटका केली असून स्पा सेंटरचा मॅनेजर, मालकावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पा सेंटरमधून मोबाईल व इतर साहित्य असे ७६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहेत.

मॅनेजर शिव राजेश भोसले (वय.२१,रा. एनआयबीएम रोड), स्पा मालक निखिल राजेंद्र नाईक (२६, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या बाबत महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. तरीही छुप्या पद्धतीने हे अवैध धंदे सुरू आहेत. त्यातही शहरात वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे दिसत आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात आहेत. यादरम्यान, एनआयबीएम रस्त्यावरील आयरीन स्पा’ सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली.

त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. नंतर पथकाने शनिवारी (दि.३०) दुपारी छापा टाकला. त्यावेळी आरोपी भोसले हा पिडीत तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी भोसले आणि स्पा मालक नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, तीन पिडीत तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

Web Title: Prostitution under the name of ‘spa’ centre Rescue of three young girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here