धक्कादायक! लॉजवर सुरू होते भलतेच, २ अल्पवयीन मुलींची सुटका, दलाल महिला अटकेत
एका लॉजवर गुरूवारी मध्यरात्री अचानक छापा (Raid) टाकून तेथील एका खोलीतून दोन मुलींची वेश्या व्यवसायात (Prostitution Business) जाण्यापूर्वीच सुटका.
डोंबिवली : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण पश्चिमेकडे असलेल्या एका लॉजवर गुरूवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून तेथील एका खोलीतून दोन मुलींची वेश्या व्यवसायात जाण्यापूर्वीच सुटका केली. दीड लाख रुपयांच्या व्यवहारात या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास दलाल महिलांनी भाग पाडले होते. या दोन्ही महिला दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंजू नंदकिशोर सिसोदिया (वय ३७ वर्षे, रा.सुंदर अपार्टमेंट, कोपरखैरणे, नवी मुंबई) आणि सरीता कृृपालिनी सिसोदिया ( वय ३५ वर्षे, रा. गणेश नायक बिल्डिंग, कोपरखैरणे, नवी मुंबई) असे वेश्याव्यवसायातील दलाल महिलांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी दीड लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अनिल पॅलेस नंबर एक लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये दोन मुलींना दलाल महिलांकडून वेश्या व्यवसायात जबरदस्तीने लोटले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या प्रकरणाची पोलिसांनी खात्री पटल्यावर त्यांनी बनावट ग्राहक तयार केले. या महिलांना बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क करुन शरीरसंबंधासाठी दोन अल्पवयीन मुली पाहिजेत, अशी विचारणा करण्यास सांगितले. यातील दलाल महिलने या व्यवहारासाठी दीड लाख रुपयांची मागणी करून कल्याणमधील ॲनिल पॅलेस लॉजमध्ये बनावट ग्राहकाला येण्यास सांगितले.
ठरल्या वेळेत ग्राहक लाॅजिंगमध्ये पोहोचून त्याने अंजू आणि सरिता यांना दीड लाखाची रक्कम दिली. तेथे दोन अल्पवयीन मुली एका खोलीत बसल्या होत्या. ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तेथील एका खोलीतून दोन मुलींना दलाल महिलांच्या तावडीतून ताब्यात घेतले. संरक्षणासाठी या दोन्ही मुलींना महिला व बालकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील हवालदार मीनाक्षी खेडेकर यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, अनैतिक व्यापार, बाल न्याय संरक्षण कायद्याने गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Prostitution starts at the lodge, 2 minor girls are released, broker women arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App