स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, पाच महिलांची सुटका
Sangali Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution ) पर्दाफाश.
सांगली: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून पाच महिलांची सुटका केली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका अपार्टमेंटमध्ये हा धंदा सुरु होता. याप्रकरणी जागा मालकाला अटक केली आहे, तर एजंट फरार झाला आहे.
विक्रम पंडित कल्याणकर असे अटक करण्यात आलेल्या जागा मालकाचे नाव आहे. तर इम्रान युनुस मुल्ला असे फरार एजंटचे नाव आहे. याबाबत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापेमारीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना सांगली मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायाची खातरजमा केली. मग या स्पा सेंटरवर छापा टाकला. छापेमारीत स्पा सेंटरमधील पाच महिलांची सुटका करण्यात आली. सदर जागेचा मालक विक्रम कल्याणकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार एजंटचा शोध घेत आहेत.
Web Title: Prostitution started under the name of spa center
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App