उच्चभ्रू परिसरात प्रोफेसर कॉलनीतील एका घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय
Breaking News | Jalgaon Crime: उच्चभ्रू परिसरात प्रोफेसर कॉलनीतील एका घरात सुरू देह विक्रीचा व्यवसाय सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली.
जळगाव : जळगावातील उच्चभ्रू परिसरात प्रोफेसर कॉलनीतील एका घरात सुरू देह विक्रीचा व्यवसाय सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे.
या घरामध्ये एक बांगलादेशी तरुणी भेटली असून, तेथून तिची सुटका करत पोलिसांनी तिला शासकीय आशादिप वसतीगृहात दाखल केलं आहे. सोसायटीत सुरू असणाऱ्या या प्रकारानं परिसरामध्येसुद्धा अनेक चर्चांना वाव मिळाला आहे.
सदर प्रकरणी सोसायटीतील घराची मालकीण असलेल्या एका महिलेविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सोसायटीमध्ये त्या बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवून कुंटणखाना चालवला जात होता अशी प्राथमिक माहिती समोर आली.
पुण्यातील सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जळगावातील या उच्चभ्रू सोसायटीतील घरावर छापा टाकून ही कारवाई केली.
कारवाईत सापडलेल्या बांगलादेशी तरुणीकडे बांगलादेशातील ओळखपत्र देखील आढळून आले आहे. त्यामुळं ती भारतात कशी आली आणि ती या जाळ्यात कशी अडकली या मार्गानं आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान जळगावातील या घटनेच्या तपासादरम्यान या प्रकरणाची पाळंमुळं नेमकी कुठवर पसरली आहेत आणि यामध्ये नेमका कोणकोण सहभागी आहे याचाही शोध पोलीस घेत असल्याचं कळत आहे.
Breaking News: prostitution business was operating in a house in Professor Colony, an elite area