देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश, ३ पुरुष आणि ५ महिला ताब्यात
Nashik Prostitution Business: एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय, नकली ग्राहक पाठवून या गुन्ह्याचा पर्दाफाश, या कारवाईत ३ पुरुष आणि ५ महिलांना ताब्यात घेण्यात आले.
नाशिक: शहरामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ पुरुष आणि ५ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांना गुप्त माहितीनुसार नाशिकच्या वडाळा नाका भागात असलेल्या कोर्टयार्ड हॉटेलच्या शेजारी एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईत ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार नाशिक शहर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांना काल गुप्त बातमीदार मार्फत नाशिकच्या वडाळा नाका भागात असलेल्या कोर्टयार्ड हॉटेलच्या शेजारी एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नकली ग्राहक पाठवून या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच महिलांची सुटका करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान एक आरोपी फरार असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७० तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
Web Title: Prostitution business busted, 3 men and 5 women arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App