लॉजवर वेश्या व्यवसाय, तीन तरुणींची सुटका, तिघांवर गुन्हा
Crime News: मलबार लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग या लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर (Prostitution) पोलिसांचा छापा.
सातारा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मलबार लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग या लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २४ रोजी दुपारी साडेचार वाजता करण्यात आली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर मानवी अनैतिक व्यापार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम परमेश्वर काकडे (वय २८, रा. लातूर), जय अमर कांबळे (वय २०, रा. प्रतापसिंह नगर, सातारा), अमित वाघमारे (रा. बुधवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी की, मलबार लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाड (Raid) टाकली. त्यावेळी नवी मुंबईतील तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून राहून वरील संशयितांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर- आमंदे या अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Prostitution business at lodge, three young women freed, crime against three
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App