अहमदनगर: जिल्ह्यात २८ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
Breaking News | Ahmednagar: जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत १५ ते २८ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.
अहमदनगर : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत १५ ते २८ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे मनाई करण्यात आली आहे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
Web Title: Prohibitory order in the district till June 28
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study