खळबळजनक! इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्राध्यापकाची आत्महत्या
Miraj Suicide Case: नवविवाहित सहायक प्राध्यापकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
मिरज : मिरज शहरातून एक खळबळजनक घटना घडली आहे. नवविवाहित सहायक प्राध्यापकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ०६) रात्री घडली आहे.
बाळकृष्ण अनिल शिंदे (वय 26, रा. टाकळी रस्ता, मिरज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिंदे हे मिरज शहरातील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जीवन संपविण्यापूर्वी प्राध्यापक शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
Web Title: Professor commits suicide while sharing story on Instagram