अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बायकोचा खून करणाऱ्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या
अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बायकोचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
नागपूर: अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बायकोचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. श्यामराव ऋषीजी शेंडे (४०, मुडझा, जि. गडचिरोली) असे मयत कैद्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे मध्यवर्ती कारागृहातील गस्तप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्यामराव शेंडे हा शेती करायचा. लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने पत्नीला मारहाण करून तिला अनैतिक संबंध तोडण्यास सांगितले होते. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. जवळपास १२ वर्षे ती माहेरी राहिल्यानंतर तिला गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याने पुन्हा नांदायला आणले होते.
दोन वर्षे संसार केल्यानंतर पत्नीचे पुन्हा अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने २०२० मध्ये पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. गेल्या दोन वर्षांपासून तो चंद्रपूर कारागृहात होता. त्याला १३ एप्रिल रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्याला महिन्याभरापूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. जन्मठेप झाल्यामुळे तो नैराश्यात गेला. उर्वरित आयुष्य कारागृहातच काढावे लागणार, या भीतीमुळे तो एकाकी झाला होता.
त्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता कारागृहाच्या रंगकाम करण्याच्या भींतीच्या खिडकीला पायजामाच्या नाड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्ध्या तासाने ही बाब एका कैद्याच्या लक्षात आली. त्याने कारगृह अधिकाऱ्यांना माहिती दिली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
Web Title: prisoner who killed his wife who had an immoral relationship committed suicide
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App