संगमनेर: कैदी पलायनाचे कटकारस्थान महिन्यापासून, असा रचला कट
Sangamner News: कारागृहातून गज कापून पलायन केलेल्या चौघा आरोपींकडे गावठी कट्टा, काडतुसे, मोबाईल आढळले.
संगमनेर: संगमनेरमधील कारागृहातून गज कापून पलायन केलेल्या चौघा आरोपींकडे गावठी कट्टा, काडतुसे, मोबाईल आढळले. त्यामुळे संगमनेरच्या कारागृहात केवळ हेक्सॉ ब्लेडचे पातेच नव्हे तर गावठी कट्टे व मोबाईलही पोहोचले होते का? याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान या चौघाही आरोपींनी नेपाळला पलायन करण्याचा बेत आखला होता, असे तपासात आढळले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर उपस्थित होते. कारागृहातून पलायन केलेल्या आरोपींना पोलिसांनी काही तासांतच पुन्हा अटक केल्याने पोलीस अधीक्षक ओला यांनी पथकातील पोलिसांना रोख रकमेची पारितोषिके देण्याचे जाहीर केले आहे.
खून, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघा आरोपींनी संगमनेरमधील कारागृहाचे गज कापून बुधवारी पहाटे पलायन केले. राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल उर्फ थापा, आनंद छबू ढाले व मच्छिंद्र मनाजी जाधव अशी चौघा आरोपींची नावे आहेत. या चौघा आरोपींना मदत करणारे मोहनलाल नेताजी भाटिया (४७, वडगाव शेरी, पुणे) व अल्ताफ असिफ शेख (२७, कुरण, संगमनेर) अशा ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या ६ जणांना जामनेर (जळगाव) येथील शेतात अटक करण्यात आली. या कटकारस्थानात आणखी काहीजण सहभागी असल्याचा संशय पोलीस अधीक्षक ओला यांनी व्यक्त केला.
भाटिया व अल्ताफ या दोघांनी चौघाही आरोपींना पलायनासाठी भाड्याने वाहन उपलब्ध करून दिले. वाहनचालक म्हणून त्यांच्या समवेत गेले. हे वाहन कारागृहाच्या बाहेर रस्त्यावर चौघा आरोपींची वाट पाहत उभे होते. यावरून पलायनाचा कट पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पलायन करताना आरोपींनी गृहरक्षक दलाच्या जवानास मारण्यासाठी गज उभारला. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पलायन प्रकरणाची प्राथमिक चौकशी अकोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नंतर अंतिम चौकशी उपाधीक्षक दर्जाचा अधिकारी करेल.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी राहुल काळे व अनैसर्गिक कृत्याच्या आरोपावरून अटकेत असलेला अल्ताफ शेख हे दोघे पूर्वी एकाच कारागृहात होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. नंतर त्याच आधारावर पलायनाच्या कारस्थानात अल्ताफ सहभागी झाला. अल्ताफ व भाटिया याच्याशी संपर्क करून काळे यांनी पुण्यातील अनिकेत केंगिरे (वडगाव शेरी, पुणे) याची गाडी भाड्याने ठरवली.
कुलरच्या आवाजात गज कापले
पलायनाचे कटकारस्थान महिन्यापूर्वी शिजले. कारागृहाचे गज कापण्याचा उद्याोगही महिनाभरापासून सुरू होता. पलायन केलेल्या चौघांसमवेत बराकीत एकूण १४ कैदी होते. चौघांनी पलायन केले तर इतर १० जणांना महिनाभरापासून सुरू असलेल्या उद्याोगाची माहिती मिळाली नाही का, ते गप्प का बसले, याची चौकशी पोलीस करणार आहेत. कारागृहात छोटा कुलर होता. त्याच्या आवाजात गज कापण्याचा उद्याोग केला जात होता
Web Title: Prisoner Escape Conspiracy From months, such a conspiracy was hatched
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App