मुख्याध्यापकास संस्था चालकाकडून मारहाण, तीन जणांवर गुन्हा
Ahmednagar | Jamkhed Crime: जामखेडला मुख्याध्यापकास संस्था चालकाकडून मारहाण तीन जणांवर गुन्हा दाखल : जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी केला घटनेचा निषेध.
जामखेड : जामखेड येथील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकास शाळेत काम करत असताना, संस्था चालकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. मुख्याध्यापक यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या संस्था चालकासह तीन जणांवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी निषेध केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करून अटकेची मागणी केली आहे.
अँग्लो उर्दू हायस्कूल जामखेड शहरातील टेकाळे वस्ती या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून युनूस अकबर शेख (वय ५५) हे २८ वर्षांपासून सेवा देत आहेत. मुख्याध्यापक आहेत. आजारी असल्याने ते २२ ऑगस्ट, २०१२ पासून वैद्यकीय रजेवर होते. त्यांची तब्येत सुधारल्याने ते शाळेत १२ सप्टेंबर रोजी हजर होण्यास पत्नीसह आले होते. ते शाळेवर काम करत असताना शाळेचे संस्था चालक मोहसीन अमजद सय्यद त्यांच्या पत्नी तबसूम अमजद सय्यद व त्यांची बहीण आजिया शाईन युसूफ शेख (रा. जामखेड) यांनी येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबद्दल मुख्याध्यापक शेख यांनी विचारणा केली असता, संबंधितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी शेख यांच्या पत्नीने मध्यस्थी केली असता, त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. शाळेतून निघून जा, म्हणत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी वरील तीन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Principal assaulted by institute driver, crime against three