Home अहमदनगर बेपत्ता असल्याचा बनाव, बापच निघाला मुलाचा मारेकरी

बेपत्ता असल्याचा बनाव, बापच निघाला मुलाचा मारेकरी

Breaking News | Ahmednagar: बापच निघाला मुलाचा मारेकरी, पुरावा नष्ट करून बापानेच दिली तक्रार.

Pretending to be missing, the father turned out to be the killer of the son

अहमदनगर : बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून देत मुलगा बेपत्ता झाल्याची खबर पोलिस ठाण्यात दिली. मात्र, पोलिसांना संशय आल्याने बापाचे बिंग फुटले. बापासह मृताच्या भावाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश अशोक एकाडे (रा. बुरुडगाव, नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अशोक एकाडे व त्याच्या दुसऱ्या मुलाला अटक करण्यात आली आहे. अशोक एकाडे यांनी मुलगा गणेश हा बेपत्ता झाला आहे, अशी खबर कोतवाली पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला. परंतु, मुलगा गणेश मिळून आला नाही. पोलिसांना फिर्यादी अशोक एकाडे याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी फिर्यादीला ताब्यात

घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने आपणच मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तारीने बांधून दुसऱ्या मुलाच्या मदतीने विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पोलिस आरोपीला घेऊन मृतदेह टाकलेल्या विहिरीजवळ गेले. मृतदेह विहिरीतून काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, वाघमारे यांनी हा तपास केला आहे.

Web Title: Pretending to be missing, the father turned out to be the killer of the son

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here