कर्ज फेडण्यासाठी लोन अॅपकडून दबाव, तरुणाची आत्महत्या
Pune Crime: लोन अॅपवर होणाऱ्या सततच्या बदनामीमुळे 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या.
पुणे: पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लोन अॅपवर होणाऱ्या सततच्या बदनामीमुळे 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. सोहेलचे वडील जावेद शेख यांनी पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल याने काही महिन्यांपूर्वी वेग वेगळ्या लोन अॅपद्वारे कर्ज घेतले होते. एक कर्ज फेडण्यासाठी तो दुसरे लोन घ्यायचा. कर्जाची रक्कम वाढतच गेल्याने अखेर सोहेलला कर्ज फेडणे अशक्य झाले. घेतलेल्या कर्जाची तो वेळेवर परतफेड करू शकला नाही. त्यामुळे त्याला धमक्यांचे आणि शिवीगाळ करणारे फोन येत होते.
इतकंच नाही तर तुझी बदनामी केली जाईल, असे देखील संबधित लोन अॅपद्वारे सांगण्यात येत होते. या त्रासाला कंटाळून सोहेल शेख याने राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, सोहेलचे वडील जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Pressured by loan app to pay off loan, youth commits suicide