Home संगमनेर संगमनेर तालुक्यात सव्वा एकर क्षेत्रातील डाळिंब बागेला आग

संगमनेर तालुक्यात सव्वा एकर क्षेत्रातील डाळिंब बागेला आग

Pomegranate orchard in a quarter acre area in Sangamner taluka caught fire

संगमनेर| Sangamner: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील हसनाबाद शिवारात सव्वा एकर क्षेत्रातील डाळिंब बागास आग लागून जवपास २०२ डाळिंबाचे झाडे जळून खाक झाली आहे. या आगीत सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.

तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम तुळशीराम दिघे यांच्या मालकीच्या शेतात हसनाबाद शिवारात सव्वा एकर डाळिंब बाग आहे. सोमवारी अचानक साडे बारा वाजेच्या सुमारास सदर डाळिंब बागेला आग लागली. काही क्षणातच ही आग सर्वत्र पसरली. तुकाराम दिघे यांचा मुलगा अनिल दिघे याच्या हा प्रकार लक्षात येताच त्याच्यासह कुटुंबियांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझविण्यात ते अपयशी ठरले. या आगीत सुमारे २०२ डाळिंब झाडे जळून खाक झाली. या बागेतील ठिंबक सिंचन साहित्य जळून गेले. डाळिंब बागेवरून वीज वाहक तारा गेल्या असल्याने घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने आग लागली असावी असा अंदाज तुकाराम दिघे यांनी व्यक्त केला. महसूल विभागाने जळीत डाळिंब बागाचा पंचनामा करावा अशी मागणी तुकाराम दिघे यांनी केली आहे.

Web Title: Pomegranate orchard in a quarter acre area in Sangamner taluka caught fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here