Home संगमनेर मतांची पोळी भाजण्याकरिता जातीपातीचे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण: आ. थोरात

मतांची पोळी भाजण्याकरिता जातीपातीचे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण: आ. थोरात

Breaking News | SAngamner Vidhansabha Election 2024: कोणत्याही ठोस योजना न करता फक्त मतांची पोळी भाजण्याकरिता जातीपातीचे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण करण्यापलीकडे या सरकारने अडीच वर्षात कोणतेही काम केले नाही.

Politics of casteism and politics of violence to win votes

संगमनेर:  सध्याचे सरकार हे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र अशा गोष्टींना थारा देत नाही. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील खांबे येथील कामधेनू उपसा सिंचन योजना कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

अनेक वर्षापासून खांबे गावचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कामधेनू सिंचन योजनेचे आज आपण भूमिपूजन केले. ही योजना महाविकास आघाडी सत्तेवर असताना जलसंधारण विभागाकडून मंजुरी मिळाली होती. परंतू खोके सरकार आल्यानंतर सदरच्या योजना थांबविण्यात आल्या. सतत पाठपुरावा करून आज भूमिपूजन सुद्धा करतो आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना राज्यातील शेतकर्‍यांसाठी व जनतेसाठी अनेक चांगल्या योजना अंमलात आणण्याचे काम केले होते. परंतू महायुती सरकारमुळे सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

कोणत्याही ठोस योजना न करता फक्त मतांची पोळी भाजण्याकरिता जातीपातीचे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण करण्यापलीकडे या सरकारने अडीच वर्षात कोणतेही काम केले नाही. काही नेते मंजूर झालेल्या योजनांना अडचणी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतु येणार्‍या काळात त्यांचा बंदोबस निश्चितपणे करू, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.

Web Title: Politics of casteism and politics of violence to win votes

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here