एका राजकीय नेत्याचा अश्लील व्हिडियो व्हायरल, गुन्हा दाखल
अहमदनगर: विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याची प्रकरणात नगर तालुक्यातील एका राजकीय नेत्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल होताच त्या नेत्याचा अश्लील व्हिडियो सोशियल मेडीयावर व्हायरल (pornographic video goes viral )केला आहे. सादर व्हिडियो व्हायरल करणाऱ्या विरोधात एम आयडी सी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नेत्याच्या भावाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा भाऊ व महिला यांचा बनावट अश्लील व्हिडियो दोन ग्रुपवर व्हायरल करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडियो नातेवाईकांना पाठविण्यात आला आहे. यामुळे समाजात आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन झाली आहे. राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने कट कारस्थान असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन मोबाईलधरकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Political leader’s pornographic video goes viral