Home धुळे स्ट्राँगरूमबाहेर तैनात पोलिसाने स्वतःवर झाडली गोळी

स्ट्राँगरूमबाहेर तैनात पोलिसाने स्वतःवर झाडली गोळी

Breaking News | Dhule: स्वतःच्या एसएलआर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

Policeman posted outside strongroom shoots himself

धुळे : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉगरूम बाहेर ड्युटीवर तैनात हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी (वय ४८) यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वतःच्या एसएलआर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी सूर्यवंशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीचा आवाज झाल्याने बाजार समितीच्या आवारात असलेले तरुण तिकडे धावून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतील सूर्यवंशी यांना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.

सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर झाली असून, ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

जखमी उमेश सूर्यवंशी यांची आतापर्यंतची पोलिस दलातील कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांना २०२३ मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तसेच पोलिस विभागातर्फे त्यांच्यावर आतापर्यंत २४ वेळा विविध प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झाली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Breaking News: Policeman posted outside strongroom shoots himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here