Home पुणे संगमनेरच्या पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेरच्या पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Suicide Case: संगमनेर तालुक्यातील मुळचे रहिवासी असलेले पुण्यातील खडकी येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना.

Police sub-inspector of Sangamner committed suicide

पुणे : संगमनेर तालुक्यातील मुळचे रहिवासी असलेले पुण्यातील खडकी येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अण्णा उर्फ अनिल गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलीस उप निरीक्षकाचे नाव आहे. मागील तीन दिवसांपासून गुंजाळ हे ड्युटीवर नव्हते. लोणावळ्यातील टायगर पॉईंट लगत त्यांनी झाडाला गळफास घेतला. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे

 घटनेच्या ठिकाणी गुंजाळ यांची गाडीही आढळून आली आहे. या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचे कारण दडलेले असू शकते. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून याठिकाणी गुंजाळ यांची असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्वी काही लिहून ठेवले आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

अण्णा गुंजाळ हे गेले दोन वर्षांपासून खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकात कार्यरत होते. ते मुळचे अहिल्यानगर मधील संगमनेर येथील आहेत. ते ३ फेब्रुवारीपासून रजेवर होते. त्याबाबत त्यांनी काही कळविले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी सांगितले.

लोणावळा पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधले जात आहे.

दरम्यान पुणे पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी संगमनेरमध्ये येताच परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. दुर्दैवी वृत्त समजतात त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Web Title: Police sub-inspector of Sangamner committed suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here