Home जळगाव Bribe: पोलीस उपनिरीक्षक एक लाखाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

Bribe: पोलीस उपनिरीक्षक एक लाखाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

Police sub-inspector caught taking Rs 1 lakh bribe

Jalgaon | मेहुणबारे | जळगाव: मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक योगेश ढीकले यास काल दुपारी दोनच्‍या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारात एक लाखाची लाच (Bribe) घेतांना रंगेहात पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे  पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादीस गुन्ह्यात मदत करून दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखाची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती एक लाख स्विकारणाऱ्या मेहुणबारे पोलीस स्टेशनचे संशयीत आरोपी योगेश ढिकले एका गुन्ह्यात तपास अधिकारी होते. त्या गुन्ह्यांतील संशयीत आरोपीस गुरुवारी व शनिवारी पोलिस स्टेशनमध्‍ये हजेरी लावण्याचे कोर्टाचे आदेश असुन त्या गुन्ह्याचे दोषारोपत्र व हजरी कामी मदत करण्यासाठी आरोपी ढिकले याने साडेचार लाखाची मागणी केली होती. मात्र तडजोड अंती एक लाख देण्याचे ठरल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबी तक्रार केली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी करून दुपारी 2 वाजता मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे सापळा रचुन ढिकले यांना पो.स्टे.च्या आवारात लाच (Bribe Accepting) स्विकारतांना रंगेहाथ पकडले. एसीबीचे पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

Web Title: Police sub-inspector caught taking Rs 1 lakh bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here