Home संगमनेर संगमनेरमध्ये बनावट ताडी बनविणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

संगमनेरमध्ये बनावट ताडी बनविणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Breaking News | Sangamner: अवैध ताडी बनविणाऱ्या अड्ड्यावर चक्क पुणे पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ.

Police raids fake toddy shop in Sangamner

संगमनेर: अवैध ताडी बनविणाऱ्या अड्ड्यावर चक्क पुणे पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या वेल्हाळे गावच्या परिसरात बनावट ताडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुणे पोलिसांनी ताब्यात घगेवून तिघांना अटक केल्याची माहिती मिळाली.

संगमनेरात बनावट ताडीचे मोठे रॅकेट असतानादेखील राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाला कसलीच खबर लागली नाही, हे विशेष या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरासह तालुक्यातील वातावरण तणावात असताना रविवारी सकाळी पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये प्रवेश करत ही कारवाई केली. आतापर्यंत ४-५ ठिकाणी छापा टाकत पुणे पोलिसांनी शहर पोलिस निरीक्षकांना सोबत घेत वेल्हाळे परिसरातील कारवाई करत कुरकुंडी (आंबी खालसा) येथील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेतले.

Web Title: Police raids fake toddy shop in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here