Home पुणे रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, एकनाथ खडसे यांचा जावई रंगेहाथ सापडल्याने खळबळ

रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, एकनाथ खडसे यांचा जावई रंगेहाथ सापडल्याने खळबळ

Breaking News | Eknath Khadse: एकनाथ खडसे यांचा जावईच पुण्यामध्ये रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ सापडल्याने राज्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली.

Police raid rave party, Eknath Khadse's son-in-law found red-handed 

पुणे: कधीकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये वाद पेटला असतानाच एकनाथ खडसे यांचा जावईच पुण्यामध्ये रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ सापडल्याने राज्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना आज पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये रंगेहाथ हात पकडून अटक करण्यात आली आहे. ही रेव्ह पार्टी ऑनलाइन बुक केलेल्या खराडीमधील उच्चभ्रू भागातील महागड्या फ्लॅटमध्ये सुरू होती. या फ्लॅटमध्येच हुक्का, दारूसह अंमली पदार्थ सुद्धा सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान जावई रंगेहाथ सापडताच एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन जावयाच्या संदर्भात विचारणा केली असता एकनाथ खडसे म्हणाले की, यासंदर्भातील मला माहिती तुमच्याकडूनच पहिल्यांदा भेटत आहे आणि हे होणारच होतं हे मला माहीत आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मात्र, यामध्ये राजकीय कारवाईचा वास येत आहे का? अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाहीत. त्यांच्यावर दबाव असू शकत. जो दोष असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे असे सुद्धा खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र मला या कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी असल्याने त्यावेळी बोलेन असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे त्यांना अडकवण्याची मालिका सुरू आहे. त्यामुळे मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही. यामध्ये षड्यंत्र असल्यास समोर आले पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी बोलताना केली.

Breaking News: Police raid rave party, Eknath Khadse’s son-in-law found red-handed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here