Home अहमदनगर कॅफे हाऊसवर पोलिसांचा छापा;  महाविद्यालयीन तरुण-तरुणी ठाण्यात

कॅफे हाऊसवर पोलिसांचा छापा;  महाविद्यालयीन तरुण-तरुणी ठाण्यात

Breaking News | Ahmednagar:  कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. या छाप्यात काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी त्याठिकाणी आढळून आल्या.

A police raid on cafe house College youth in Thane

श्रीरामपूर: शहरातील नेवासा रोडवर महाविद्यालय परिसरात असलेल्या एका कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. या छाप्यात काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. या कॅफेत सोयीस्कर छुपे कप्पे बनविल्याचे आढळून आहे. काही तरुण व तरुणींना पोलीस ठाण्यामध्ये आणले होते. परंतू पुन्हा सोडून देण्यात आले. अशा प्रकारामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कॅफे हाऊस सुरू आहेत. या कॅफे हाऊसमध्ये अनैतिक प्रकार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसापुर्वी शहरातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून एक व घरातून एक अशा दोन महाविद्यालयीन तरुणी पळून गेल्या होत्या. अशाप्रकारे पळून जाण्याची गंभीर घटना आहे. याबाबत काही सुज्ञ पालकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केल्याची समजते. त्याची दखल घेवून काल पोलिसांनी नेवासा रोडवरील त्या कॅफे हाऊसवर छापा टाकला. श्रीरामपूर शहरात ग्रामीण भागातून अनेक तरुण तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात. परंतू शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन अशा प्रकारचे कृत्य त्यांच्याकडून केले जाते. या छाप्याची शहरात काल दिवसभर चर्चा होती. परंतू याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल का? झाला नाही. याबाबत काही समजू शकले नाही.

Web Title: A police raid on cafe house College youth in Thane

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here