Home संगमनेर संगमनेरमध्ये बेकायदा कत्तलखाण्यावर पोलिसांचा छापा, साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरमध्ये बेकायदा कत्तलखाण्यावर पोलिसांचा छापा, साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

Breaking News  | Sangamner Crime: दुसऱ्यांदा बेकायदा गोवंशाची कत्तल होत असलेल्या ठिकाणावर छापा टाकत सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

Police raid illegal slaughterhouse in Sangamner, seized valuables worth Rs 12.5 lakh

संगमनेर : संगमनेरमध्ये सातत्याने गोवंशाची कत्तल होत असल्याच्या मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करत आमदार अमोल खताळ यांनी वरिष्ठांना खोटी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस दलाने आज दुसऱ्यांदा बेकायदा गोवंशाची कत्तल होत असलेल्या ठिकाणावर छापा टाकत सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र याही वेळी आरोपी आश्चर्यकारकरीत्या पसार होण्यात यशस्वी झाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरातील तीनबत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना एका ठिकाणी गोवंशाची कत्तल चालू असल्याची माहिती मिळाली. शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमर अली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत अशी माहिती मिळताच, सोनवणे यांनी याची माहिती आपल्या पथकाला देत कारवाईसाठी बोलावून घेतले. पोलीस नाईक राहुल कचरु डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग, आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे त्यांचे पथक तात्काळ तीनबत्ती चौकात आले.

पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, फैजु फारुक कुरेशी यांच्या वाड्यावर छापा (Raid) टाकला असता, तिथे एक व्यक्ती गोवंश कत्तल करताना, तर दुसरा कत्तल केलेले गोमांस चारचाकी वाहनात भरताना आढळून आला. पथकाने तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि अंमलदार यांना दोन पंचांसह घटनास्थळी बोलावले.

पोलिसांना पाहताच आरोपी कमर अली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुढन कुरेशी यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, सदर वाडा फैजु फारुक कुरेशी यांचा असल्याचे समोर आले.

घटनास्थळाची आणि वाहनाची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गोमांसाचे अनावश्यक अवयव आढळून आले. तसेच, एक कोयता, एक लोखंडी हुक असलेला वजन काटा, आणि पळून गेलेल्या आरोपींच्या चपलाही जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये महिंद्रा झायलो जीप, (एमएच ०२ बीएम १५०३) गाडी, रु. ७,५०,०००/- किमतीचे अंदाजे २५०० किलो गोमांस आणि अवयव, एक लोखंडी कोयता, इलेक्ट्रॉनिक वजन काटा यांचा समावेश आहे. एकूण रु. १२लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.

Breaking News: Police raid illegal slaughterhouse in Sangamner, seized valuables worth Rs 12.5 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here