Home क्राईम पोलीस निरीक्षकच अडकला एसीबीच्या जाळ्यात,  मागितली १० हजार रुपयांची लाच

पोलीस निरीक्षकच अडकला एसीबीच्या जाळ्यात,  मागितली १० हजार रुपयांची लाच

Bhandara Crime: सहायक पोलिस निरीक्षक यांना लाच (Bribe) स्वीकारताना अटक.

police inspector got caught in the ACB's net, demanded a bribe of 10 thousand

भंडारा : भंडारा शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक यांना लाच स्वीकारताना अटक केल्याची घटना समोर आली आहे. गुन्ह्यातून मुलाचे नाव वगळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ठरलेली रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

भंडारा शहर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. तक्रारदार यांचा मुलास इतर तीन मुलांवर गुन्हा दाखल असून तक्रारदार यांच्या मुलाचा शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठीच मुलाचे नाव वगळायचे असल्यास १५ हजार रुपयांची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश साठवणे यांनी केली होती. पण तडजोडी अंती १० हजार रूपये घेण्याची इच्छा दाखविली.

तक्रारदार यांची लाच देण्याची मुलाची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून १० हजार रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी सहायक पोलिस निरीक्षक यांच्या विरूद्ध भंडारा शहार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: police inspector got caught in the ACB’s net, demanded a bribe of 10 thousand

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here