Crime: संगमनेर शहरात पोलिसांना दमबाजी
संगमनेर | Crime: संगमनेर शहरात पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक गंभीर प्रकार घडला. आता त्याच परिसरात दिल्ली नाका तीन बत्ती परिसरात तीन व्यक्तींनी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर पंडित, पोलीस कॉन्स्टेबल भोजे, भालेराव हे तीन बत्ती परिसरात गस्त घालत असताना यावेळी अचानक त्यांच्यासमोर तिघे जण ते म्हणाले ‘ आमच्या लोकांनी मागच्या वेळेस पोलिसांना पळून मारले होते. आमच्या परिसरात पुन्हा आले तर तुमचे काही खरे नाही अशा भाषेत तिघांनी धमकी दिली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर पंडित यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
Web Title: Police in Sangamner town crime filed