अहिल्यानगर: पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात
Breaking News | Ahilyanagar Crime: दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार व त्याच्या नातेवाईकाला मदत करण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले.
नगर : दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार व त्याच्या नातेवाईकाला मदत करण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार संतोष सुधाकर फलके (वय ४०, नेमणूक श्रीगोंदा पोलिस ठाणे) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार व त्यांचे अन्य १३ नातेवाईकांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार संतोष फलके यांच्याकडे आहे. त्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी हवालदार संतोष फलके यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस
हजारांच्या लाच मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २७) रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान हवालदार संतोष फलके याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तडजोडीअंती प्रत्येकी ५०० प्रमाणे एकूण सात हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. गुरूवारी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने सापळा लाऊन हवालदार फलके यास सात हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलिस हवालदार राधा खेमनर, गजानन गायकवाड, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.
Web Title: Police constable in bribery net