पोलीस कॉन्स्टेबलने विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं, धक्कादायक घटनेने हळहळ
Police Constable Suicide: पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका कॉन्स्टेबलने विष प्राशन करून आत्महत्या.
नागपूर : नागपूर पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका कॉन्स्टेबलने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. बुधवारी २९ जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने संपूर्ण विभागाला धक्का बसला आहे. रामचंद्र नानाजी रोहनकर असं मयत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
अधिक माहिती अशी की, , मृत कॉन्स्टेबल रामचंद्र रोहनकर यांना एका हॉटेलमध्ये भांडण केल्यामुळे तीन महिन्यासाठी बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी परत आपली ड्यूटी जॉईन केली. मात्र १० दिवसांपूर्वी या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आल्याची नोटीस मिळाली आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस ही देण्यात आली होती. त्यामुळे ते तणावात होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन घर विकत घेतल्याची माहिती आहे. तसंच मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा त्यांच्यावर प्रचंड ताण होता. आर्थिक समस्यांमुळे त्यांना मानसिक दबावाचा सामना करावा लागला आणि ते तणावात होते. या तणावामुळे त्याने विष प्राशन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच पोलीस प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Web Title: police constable committed suicide by consuming poison
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News