Bribe: पोलीस हवालदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले
श्रीरामपूर | shrirampur: श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन दोन हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वार्ड क्र. 3 च्या बीट चौकीवर नेमणुकीसअसलेले संजय काळे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भा. दं. वि. कलम 392 च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिट प्रकरणी संजय काळे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील बिट चौकी न 3 चे कार्यालय येथे स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या समवेत पोलीसा नाईक प्रकाश महाजन, एकनाथ बाविस्कर, पळशीकर यांनी केली आहे.
Web Title: Police caught the constable red-handed while taking bribe