धक्कादायक: नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून विषप्रयोग
Pathardi Taluka | पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून विषप्रयोग करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादीवरून तिसगाव येथील सासरच्या तिघां विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती वैभव बाळासाहेब पातकळ, सासरा बाळासाहेब लक्ष्मण पातकळ व सासू विजया बाळासाहेब पातकळ (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशियीत आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पातकळ कुटुंबातील नवविवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार लग्नानंतर माहेरहुन आई-वडिलांकडून जमीन खरेदीसाठी चार लाख रुपये आणावेत म्हणून नवरा, सासरा, व सासू यांनी गाजराच्या हलव्यामध्ये विषारी औषध टाकून तो गाजराचा हलवा बळजबरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाविहीतेने केला आहे.
तसेच यापुर्वी वेळोवेळी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. नवविवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही संशयित फरार झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ हे अधिक तपास करत आहेत.
Web Title: Poisoning from carrot stirring on newlyweds