Home महाराष्ट्र चित्रपटात भूमिका देण्याच्या मोबदल्यात साजिदने विवस्त्र होण्यास सांगितले: मॉडेलचा आरोप

चित्रपटात भूमिका देण्याच्या मोबदल्यात साजिदने विवस्त्र होण्यास सांगितले: मॉडेलचा आरोप

paula and Sajid khan strip

मॉडेल पौलाने साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत. याबाबत मॉडेल पौलाने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहून आरोप केले आहेत. मॉडेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

मी टू मोहिमेदरम्यान मी गप्प बसले होते कारण माझ्यामागे कोणी गॉडफादर नव्हता. माझ्या आई वडिलांसाठी काम करणे गरजेचे होते. मात्र आता माझे आई वडील माझ्या सोबत नाहीत. मी फक्त माझ्यासाठी कमावतेय. त्यामुळे मी आता उघडपणे सत्य बोलत आहे, असे म्हणत साजिद खानवर आरोप केले आहेत.

पौलाने जेव्हा १७ वर्षाची होती, तेव्हा साजिदने तिचे शोषण केले होते असे तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे. साजिद अश्लील मेसेजेस पाठवायचा. मला चुकीच्या पद्धतीने अंगाला स्पर्श करायचा. त्याने हाउसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या मोबादल्यात त्याच्यासमोर विवस्त्र होण्यास सांगितले. असे किती महिलांसोबत केले असेल देव जाणो. त्याला डांबले पाहिजे. सोशियल मेडीयावर साजिद खानला अटक झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.  

Web Title: playing the role in the film Sajid khan asked her to undress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here